हिंदु जनजागृती समितीचे राजस्थानमध्ये ‘संस्कृती रक्षण अभियान’ !
महाविद्यालयांमध्ये करण्यात आली जागृती !
जोधपूर (राजस्थान) – ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या पश्चिमी कुप्रथांना युवकांनी बळी पडू नये आणि भारतीय संस्कृतीतील प्रेमाच्या व्यापक स्वरूपाची ओळख युवकांना व्हावी, या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे यंदाही ‘संस्कृती रक्षण अभियान’ चालवण्यात आले. राजस्थान येथील जोधपूर आणि पाली या जिल्ह्यांत विविध महाविद्यालयांमध्ये ही जागृती करण्यात आली. त्यासह ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या दिवसांचा अपलाभ घेऊन युवतींची छेडछाड करणार्या समाजकंटकांना धडा शिकवण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याची मागणीही स्थानीय प्रशासनाकडे करण्यात आली.
१. जोधपूर येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. मदनलाल नेहरा आणि जिल्हा शिक्षण अधिकारी श्री. प्रेमचंद सांखला यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी अधिवक्ता सूर्यप्रकाश शर्मा, समितीच्या डॉ. (सौ.) स्वाती मोदी, राखी मोदी उपस्थित होत्या.
२. पोलीस उपायुक्त (पूर्व) भुवन भूषण यादव यांना निवेदन देण्यात आले. निवेदन वाचून ते म्हणाले की, अशा प्रकारचे प्रबोधन व्हायला हवे. समितीने केलेल्या मागण्या अत्यंत योग्य आहेत. आम्ही त्यानुसार आदेश काढू.
३. ओंकारमल सोमानी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. अश्विनी शाह आणि लाचू महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. रोहितकुमार जैन यांना ही निवेदन देण्यात आले. ते म्हणाले की, तुम्ही चांगले कार्य करत आहात.
पुढील महाविद्यालये आणि खासगी शिकवण्या यांना देण्यात आले निवेदन !
जोधपूर येथे कमला नेहरू महाविद्यालयाचे संचालक डॉ. संगीता लुंकड, उत्कर्ष क्लासेस, सीएल्जी क्लासेस, व्यास कॉलेज; तर सोजत (पाली, राजस्थान) येथील राजकीय महाविद्यालयात प्रा. जितेंद्र राजपुरोहित, आईमाता कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. विश्वास राव, श्री विनायक महाविद्यालयाच्या प्राचार्य नम्रता दवे आणि मारवाड जंक्शन येथील राजकीय महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. रौनककुमार श्रीमाली यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा, श्री. दीपक लढ्ढा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे श्री. हर्ष टाक, श्री. पुखराज गहलोत उपस्थित होते. या वेळी राजकीय महाविद्यालय, आईमाता कन्या महाविद्यालय आणि श्री विनायक महाविद्यालयात समितीच्या श्रीमती अर्चना लढ्ढा यांनी या विषयाच्या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. याचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.
वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय
|