सांगली – ‘व्हॅलेंटाईन डे’च्या नावाखाली होणारे अपप्रकार रोखण्यासाठी सांगली जिल्ह्यात प्रशासन, लोकप्रतिनिधी, पोलीस, शाळा-महाविद्यालये येथे निवेदने देण्यात आली. निवेदन देण्यात अनेक ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या महिला कार्यकर्त्यांचा पुढाकार होता, तसेच अनेक ठिकाणी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
१. मिरज शहरात प्रांत कार्यालयात प्रभारी नायब तहसीलदार हसन निडोनी यांनी निवेदन स्वीकारले, तसेच पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात निवेदन देण्यात आले.
२. तासगाव येथे नगरपरिषदेतील मुख्याधिकारी पृथ्वीराज माने, तासगाव पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी व्ही.एल्. शेळके, तासगाव पंचायत समितीमधील शिक्षण विस्तार अधिकारी प्रकाश कांबळे यांना निवेदन देण्यात आले.
३. कवठेमहांकाळ येथील पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. राज शिंदे आणि श्री. रवींद्र सुतार उपस्थित होते.
४. ईश्वरपूर येथे महसूल अधिकारी राजू कदम आणि पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. अजित जाधव आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संतोष कुंभार उपस्थित होते.
५. कस्तुरबाई वालचंद महिला वसतीगृह, नेमीनाथनगर येथील संचालक श्री. कणेरी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी या संदर्भात योग्य ती कृती करू, असे आश्वासन दिले.
६. कुंडल येथे प्रतिनिधी हायस्कूल, सिनिअर कॉलेज, कुंडल पोलीस ठाणे, डॉ. पतंगराव कदम विद्यालय येथे निवेदन देण्यात आले.
७. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार अनंत गुरव यांना निवेदन देण्यात आले.
८. विटा येथे तहसीलदार ऋषिकेश शेळके यांना निवेदन देण्यात आले.
९. जत येथे पोलीस ठाणे, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
विशेष
१. सांगली जिल्ह्यात, तसेच जयसिंगपूर (जिल्हा कोल्हापूर) येथे मोठ्या प्रमाणात शाळा-महविद्यालयांत निवेदन देण्यात आले.
२. अनेक ठिकाणी फलकांवर लिहिण्यात आलेल्या मजकुराद्वारे नागरिकांचे प्रबोधन होण्यास साहाय्य झाले.
३. १२ फेब्रुवारी या दिवशी सांगली येथे झालेल्या आंदोलनास स्थानिक वृत्तवाहिनी ‘सी’ न्यूज यांच्यासह प्रसिद्धीमाध्यमांनी चांगल्या प्रकारे प्रसिद्धी दिली.
४. ईश्वरपूर येथे धर्मप्रेमी सौ. उलका पाटील यांनी पुढाकार घेऊन कन्या महाविद्यालय, तसेच ओंकार क्लास येथे निवेदन दिले, तसेच बत्तीस शिराळा येथे धर्मप्रेमी श्री. अशोक मस्कर यांनी पुढाकार घेऊन महाविद्यालय आणि गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन दिले.
लोकप्रतिनिधींना निवेदन
१. सांगली येथे सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या भाजप नगरसेविका सौ. उर्मिला बेलवलकर यांनी निवेदन स्वीकारल्यावर त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर असलेल्या फलकावर ‘प्रबोधपर मजकूर लिहू’, तसेच महाशिवरात्रीच्या निमित्ताने सामूहिक नामजप आयोजित करू असे म्हणाल्या. सौ. बेलवकर या १२ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्या आणि निवेदनावर स्वाक्षरीही केली.
२. सांगली येथे माजी आमदार श्री. नितीन शिंदे यांना निवेदन दिल्यावर त्यांनी सामाजिक प्रसारमाध्यमांत प्रसारित करण्यासाठी ‘व्हिडिओ बाईट’ (छोटी मुलाखत) करून दिली.
३. विटा येथे नगरसेविका सौ. प्रतिभा चोथे, सौ. मनीषा शितोळे, सौ. सानिका दिवटे यांना निवेदन देण्यात आले.