Menu Close

भाग्यनगर (तेलंगणा) येथे १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

प्रतिकात्मक छायाचित्र

भाग्यनगर (तेलंगणा) – येथील दारूल उलूम मदरशामध्ये एका १० वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणी तेथे अरबी भाषा शिकवणार्‍या २५ वर्षांच्या मौलाना शोएब अख्तर याला अटक करण्यात आली. मौलाना अख्तर याने मुलाला त्रास दिल्याचे कळताच पीडित मुलाच्या नातेवाइकांसह स्थानिक लोकांनी मदरशाला घेराव घातला. वैद्यकीय परीक्षणानंतर आरोपीच्या विरोधात कारवाई करण्यात आली. २ मासांपूर्वीच पीडित मुलाने मदरशामध्ये प्रवेश घेतला होता. ७ फेब्रुवारीच्या रात्री मुलाला असह्य त्रास होत असल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा मुलाने मौलाना अख्तर करत असलेल्या अत्याचारांविषयी सांगितले.

यापूर्वी देशातील काही मदरशांत घडलेली काही कुकृत्ये !

मदरशांमधील कुकृत्याच्या अशा प्रकारच्या घटना वारंवार समोर येत असतात.

१. नोव्हेंबर २०२१ मध्ये दादरा नगर हवेलीच्या सिलवासामध्ये एका मौलवीवर (इस्लामच्या धार्मिक नेत्यावर) मदरशाच्या वसतीगृहामध्ये राहून शिकणार्‍या अल्पवयीन मुलीने बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

२. बिहारच्या सीतामढी जिल्ह्यामध्ये मदरशातील मौलाना तबरेज याने मदरशामध्ये शिकणार्‍या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याने ती गरोदर राहिली.

३. कर्नाटकच्या तुमकुरू जिल्ह्यामध्ये अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मुफ्ती (शरियत कायद्याचे जाणकार) उशर्रफ याला बेंगळुरूच्या विशेष न्यायालयाने ११ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *