Menu Close

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

  • मंदिरांना नोटीस बजावणार्‍या धर्मादाय विभागाने मशिदींना नोटीस बजावली नाही, हे लक्षात घ्या ! याचा अर्थ हिंदूंच्या मंदिरांचे व्यवस्थापन आरतीच्या वेळी ध्वनीक्षेपकाचा आवाज न्यून करतील, याची विभागाला खात्री आहे; मात्र अशी नोटीस मशिदींना बजावली, तर त्या नोटिसीला केराची टोपली दाखवण्यात येईल, असे धर्मादाय विभागाला वाटते का ?
  • सर्व नियम आणि कायदे हिंदूंनी पाळायचे आणि अन्य पंथियांनी नियम धाब्यावर बसवायचे, असा भारतात अलिखित नियम झाला आहे. असा एकतर्फी निर्णय घेणार्‍यांना हिंदूंनी वैध मार्गाने जाब विचारावा !

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील काही मंदिरांतील महामंगलारती, अभिषेक आदींच्या वेळी निर्धारित डेसिबलपेक्षा (ध्वनी मोजण्याचे परिमाण) मोठ्या आवाजात आरती होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर धर्मादाय विभागाकडून मंदिरांना निर्धारित डेसिबलपेक्षा आवाज न्यून असावा, अशा प्रकारची नोटीस बजावण्यात आली आहे. ‘मंदिरातील घंटा, डमरू, ध्वनीक्षेपक यांचा उपयोग निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक नसावा’, असेही यात म्हटले आहे. शहरातील दोड्ड गणपति देवस्थान, मिंटो अंजनेय मंदिर, कारंजी अंजनेय स्वामी, दोड्ड बसवण्णा मंदिर, मल्लिकार्जुनस्वामी यांसह अनेक मंदिरांना धर्मादाय विभागाकडून ही नोटीस बजावण्यात आली आहे.

मशीद आणि दर्गा येथे रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत भोंग्यांचा वापर करू नका ! – वक्फ बोर्डाचा आदेश

सर्वोच्च न्यायालयानेच हा कायदा केला असतांना जर याचे कुणी पालन करत नसेल, तर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. तसे होत नसेल, तर जनतेनेच पोलिसांना वैध मार्गाने जाब विचारला पाहिजे !

कर्नाटकातील वक्फ बोर्डाने ‘रात्री १० ते सकाळी ६ या कालावधीत मशिदींच्या ध्वनीवर्धकाचा उपयोग करू नये’, असा नियम लागू केला आहे.
‘भोंग्यांच्या माध्यमातून ‘अजान’ अथवा कोणतेही इस्लामी आवाहन आणि घोषणा देण्यावर धर्मादाय विभागाने निर्बंध घातलेल्या वेळेत देण्यात येऊ नये’, असे सुचवण्यात आले आहे. ध्वनीप्रदूषण नियंत्रित करण्यासाठी हे निर्बंध लागू करण्यात आल्याचे धर्मादाय विभागाने स्पष्ट केले आहे.

१. ‘मशीद आणि दर्गा येथील ध्वनीचे प्रमाण अधिक असल्याचे लक्षात आले आहे. ते मनुष्याच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करते’, असा अभिप्राय तज्ञांनी दिला आहे. वातावरणातील ध्वनीप्रदूषणाचे नियंत्रण करण्यासाठी कायदा अस्तित्वात आहे. त्यानुसार रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत ध्वनीवर्धकाचा वापर करू नये’, असे स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे.

२. १०० मीटर अंतरावर रुग्णालय, शैक्षणिक संस्था, न्यायालय असल्यास त्याला ‘शांतताक्षेत्र’ असे घोषित करण्यात येते. या ठिकाणी ध्वनीक्षेपक, स्फोटके, फटाके लावणे अथवा सार्वजनिक घोषणा दिल्यास परिसर रक्षण कायदा १९८६ च्या अंतर्गत दंड करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *