दिनदर्शिकेवरील भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या चित्रांवर स्वतःचा अन् पत्नीचा चेहरा लावला !
हिंदूंना धर्मशिक्षण मिळत नसल्याचाच हा परिणाम आहे ! असे प्राध्यापक विद्यार्थ्यांसमोर कोणता आदर्श ठेवत आहेत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील बनारस हिंदु विद्यापिठाचे प्राध्यापक डॉ. अमरेश कुमार यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेतील भगवान श्रीराम आणि सीतामाता यांच्या यांच्या चित्रांवर स्वतःचा अन् स्वतःच्या पत्नीचा चेहरा लावला. या प्रकारामुळे त्यांना विरोध केला जात आहे.
(सौजन्य : News18 Virals)
(ही छायाचित्रे / व्हिडिओ देण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा आमचा उद्देश नसून; केलेले विडंबन कळावे, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. – संपादक दैनिक सनातन प्रभात)
या विभागात ५ फेब्रुवारीपासून चालू झालेल्या एका प्रदर्शनात कुमार यांनी ही दिनदर्शिका ठेवली आहे. कुमार यांच्या म्हणण्यानुसार, १० वर्षांपूर्वी देहली येथेही त्यांनी अशाच प्रकारच्या दिनदर्शिकेवर स्वतःचे आणि पत्नीचे छायाचित्र लावले होते. ‘ही श्रद्धेशी निगडित गोष्ट असून मी आणि माझे कुटुंब रामभक्त आहे’, असा दावा डॉ. कुमार यांनी केला आहे. (श्रद्धा कशाला म्हणतात ?, याचे हिंदूंना ज्ञान नसल्याने ते अशा प्रकारचे काहीतरी करून देवतांचा अवमानच करत आहेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)