Menu Close

महाराष्ट्रात हिजाब परिधान करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

हिजाब घालण्यासाठी फतवा काढण्यात आल्याची शक्यता !

स्वतःचे वेगळे अस्तित्व जपण्यासाठी, तसेच सरकारी यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी धर्मांध कशा प्रकारे हालचाली करतात, हे यातून दिसून येते. अशांवर आळा घालण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक !

मुंबई – कर्नाटक राज्यात शैक्षणिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्रात हिजाब परिधान करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्रच्या शहरी आणि ग्रामीण भागांत मागील काही दिवसांपासून सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करणार्‍या धर्मांध महिलांचा वावर मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यासाठी फतवा काढण्यात आल्याची शक्यता असल्याची चर्चा आता होत आहे.


कर्नाटक येथे हिजाबवरून वाद निर्माण होण्यापूर्वी महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात हिजाब परिधान केलेल्या महिलांचा वावर दिसून येत नव्हता. मागील काही दिवसांपासून मात्र सार्वजनिक ठिकाणी लहान मुलींनाही हिजाब घालण्यात आल्याचे आढळून येत आहे.

काही शैक्षणिक ठिकाणीही घालण्यात येत आहे हिजाब !

‘शैक्षणिक ठिकाणी हिजाब घालावा का ?’, याविषयीचा प्रश्‍न कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. यावर निर्णय होईपर्यंत, शैक्षणिक ठिकाणी धार्मिक पोषाख परिधान करून जाऊ नये, असे न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. असे असतांना महाराष्ट्रातील काही शैक्षणिक ठिकाणी धर्मांध विद्यार्थिनी हिजाब घालून येत असल्याचे आढळून आले आहे. मुंबईतील माटुंगा रोड (पश्‍चिम) रेल्वेस्थानकाच्या जवळ असलेल्या एका खासगी शाळेमध्ये काही विद्यार्थिनी हिजाब घालून आल्याचे आढळून आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *