Menu Close

पाकिस्तानमध्ये ८२ टक्के मुलींवर कुटुंबातील सदस्यांकडून बलात्कार होतात ! – पाकिस्तानी महिला अधिवक्ता

  • पाक तसेच अन्य इस्लामी देशांमध्ये मुली लहान वयापासून हिजाब, बुरखा आदी परिधान करतात. ‘असे असतांनाही तेथे बलात्काराचे प्रमाण अधिक का ?’, याचे उत्तर भारतात मुसलमान महिलांनी हिजाब घालण्याचे समर्थन करणारे देतील का ?
  • पाकने भारताच्या अंतर्गत गोष्टींत नाक खुपसण्यापेक्षा तेथील महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी प्रयत्न करावेत !

इस्लामाबाद (पाकिस्तान)- महिला अधिकारांसाठी लढणार्‍या एका पाकिस्तानी महिला अधिवक्त्याने पाकिस्तानी समाजाचे खरे वास्तव जगासमोर आणले. एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये बोलतांना त्या म्हणाल्या, ‘‘बलात्कार पीडित अल्पवयीन मुलींना, ‘तुमच्यावर बलात्कार कुणी केला ?’, असे विचारण्यात येते.  तेव्हा ८२ टक्के मुलींकडून त्यांचे काका, वडील, वडिलांचे वडील, आईचे वडील, मामा, भाऊ, अशी नावे समोर येतात; म्हणजे घरातील सदस्यांकडूनच लहान मुलींवर बलात्कार होतात. याविषयी समाजात वाच्यता होऊ नये; म्हणून कुटुंबीय या मुलींचा गर्भपात करतात आणि त्यांच्या कृत्यांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करतात. यावर मी ३ वर्षे काम केले. तेव्हा समाजाचा घृणित तोंडवळा माझ्या समोर आला. लोक म्हणतात, ‘हे पाशवी कृत्य आहे !’ हे पाशवी कृत्य  मनुष्यच करतो.

यावर आपण चर्चा केली, तर ही समस्या सुटेल; पण यावर कुणी बोलत नाही. ही आकडेवारी आमची एक संस्था ‘डब्लू.ए.आर्’ने दिली आहे.’’ या चर्चासत्राचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. या महिला अधिवक्त्याचे नाव मात्र समजू शकले नाही.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *