नागपूर – महाविद्यालयात साजरे होणार्या ‘डे’च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लुबाडणूक करण्याचा विदेशी आस्थापनाचा डाव आहे. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतन होत आहे.
विशेष म्हणजे युवावर्ग धर्मशिक्षणाच्या अभावी ‘डे’ला मोठ्या प्रमाणात बळी पडतो. त्यातूनच ‘लव्ह जिहाद’सारख्या भयानक घटना घडतात, त्यामुळे ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथा बंद करून भारतीय संस्कृतीचे पालन करा, असे आवाहन रामटेक येथील ताई गोळवळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश सिंगरू यांनी केले. ते १२ फेब्रुवारी २०२२ या दिवशी हिंदु जनजागृती समिती आयोजित ऑनलाईन व्याख्यानात बोलत होते. हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. अतुल आर्वेनला यांनी या वेळी उपस्थितांच्या शंकाचे समाधान केले. या व्याख्यानाचा लाभ ७० हून अधिक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी घेतला.