कलबुर्गी (कर्नाटक) येथे गुन्हा नोंद
|
कलबुर्गी (कर्नाटक) – ते (हिंदुत्वनिष्ठ) कोणते कपडे घालतात ? ते भगवे कपडे घालून हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) हटवण्याविषयी सांगत आहेत. हिजाबवर बंदी घालत आहेत. जे कुणी आमच्या मुलींना हिजाब घालण्यापासून रोखत आहेत, त्यांचे तुकडे तुकडे केले जातील, अशी धमकी येथील काँग्रेसचे नेते मुकर्रम खान यांनी दिली. त्यांच्या या धमकीचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाल्यानंतर त्यांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुकर्रम खान हे कलबुर्गी जिल्ह्यातील सेदममधील माजी पंचायत सदस्यही आहेत.
मुकर्रम खान यांचे विधान समोर आल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील पोलीस ठाण्याबाहेर एकत्र येत त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी केली. (अशी मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून कारवाई का करत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा सचिव शिवकुमार यांनी तक्रार केल्यानंतर मुकर्रम खान यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. शिवकुमार म्हणाले, ‘‘हे विधान आता अधिक प्रसारित होऊ नये. असे विधान आम्हीही करू शकतो; मात्र आम्ही समाजात अशांतता निर्माण करू इच्छित नाही.’’