नागपूर – टेलिग्राम आणि यू-ट्यूब यांच्या माध्यमातून आज हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘ऑनलाईन शौर्यजागृती व्याख्यान’ आयोजित करण्यात आले होते. रत्नागिरी येथील कु. नारायणी शहाणे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून ‘व्हॅलेंटाईन डे’सारख्या कुप्रथेविषयी जागृती, तसेच हिंदु धर्म आणि हिंदु संस्कृती यांचे रक्षण करण्यासाठी व्याख्यानाच्या माध्यमातून युवावर्गात शौर्यजागृती केली. या व्याख्यानाचा लाभ विदर्भातील अनेक जिज्ञासू युवक-युवतींनी घेतला.
आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलीदान देऊन ज्या परकियांपासून आपल्याला मुक्त केले त्या परकियांचे ‘डे’ भारतात मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात, हे आपले दुर्दैव नाही का ? असा प्रश्न कु. शहाणे यांनी या वेळी उपस्थितांना केला. ‘डे’ च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट करण्याचा विदेशी आस्थापनांचा डाव आहे. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात नैतिक अधःपतनही होत आहे. आपली महान हिंदु संस्कृती आणि महापुरुषांचे बलीदान सतत आठवूया. त्यानुसार धर्म-संस्कृती’चे रक्षण करण्यास सज्ज होऊन इतरांना जागृत करूया, असेही त्या म्हणाल्या. या वेळी जिज्ञासूंनी आपले मनोगत व्यक्त करून उत्स्फूर्त सहभाग घेतला.
जिज्ञासूंचे अभिप्राय
१. श्री. गिरीधरलाल अग्रवाल – विषय पुष्कळ आवडला. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण रोखले पाहिजे आणि अधिकाधिक युवकांनी धर्मशिक्षण घेतले पाहिजे.
२. सौ. लता किडे – प्रत्येक कुटुंबातून मुलांना धर्मशिक्षण देण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.
३. श्री. परशुराम तंदुलवार – सर्वांनी संघटित होऊन हिंदूंविषयी प्रत्येकाच्या मनात अभिमान निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, आम्ही पण या कार्यामध्ये नक्की सहभागी होणार.