शिरढोण (जिल्हा रायगड) येथे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी साजरी February 20, 2022 Share On : क्रांतीज्योत घेऊन जातांना डावीकडे श्री. विनायक वाकडीकर आणि उजवीकडे श्री. मच्छिंद्र पवार पनवेल – १७ फेब्रुवारी या दिवशी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांची १३९ वी पुण्यतिथी होती. त्यांचे जन्मगाव शिरढोण येथे क्रांतीज्योतीची मिरवणूक काढून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. क्रांतीज्योत गावातील हुतात्मा स्मारक येथून घेऊन ती गावातून ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती मंदिर’ येथे आणण्यात आली. क्रांतीज्योतीचे प्रज्वलन शिरढोण गावचे भारतीय सैन्यदलातील नायब सुभेदार श्री. भरत कर्णेकर आणि पळस्पे येथील श्री. सुजित हातमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंदार जोग आणि ‘क्रांतीज्योत मंडळ, शिरढोण’ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रतिवर्षी क्रांतीज्योत क्रांतीवीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणांहून आणली जाते. या वर्षी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता गावातीलच हुतात्मा स्मारकातून क्रांतीज्योतीची मिरवणूक काढण्यात आली. क्रांतीकारकांच्या शौर्यस्मृती जागृत करणारे फलक प्रदर्शन क्रांतीकारकांच्या शौर्य स्मृती जागृत करणारे फलक प्रदर्शन या वेळी हिंदु जनजागृती समितीनिर्मित क्रांतीकारकांचे जाज्वल्य देशप्रेम आणि शौर्याचे कथन करणार्या फलकांचे प्रदर्शन आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके स्मारकात लावण्यात आले होते. या फलक प्रदर्शनाने उपस्थितांच्या मनामधील देशासाठी बलीदान दिलेल्या क्रांतीकारकांच्या स्मृतींना जागृत केले. येथील हिंदुत्वनिष्ठ आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक श्री. विनायक वाकडीकर, श्री. मच्छिंद्र पवार आणि हितचिंतक यांनी हे फलक लावण्याचे नियोजन केले. Tags : क्रांतीकारकप्रदर्शनीहिंदु जनजागृती समितीRelated Newsमतदारांना लुटणार्या ‘खाजगी ट्रॅव्हल्स’वर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी ! – सुराज्य अभियान November 21, 2024‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा करण्यात आला संकल्प ! November 19, 2024सर्वांनी मतदान करा ! आपले एक मत महाराष्ट्रात सुराज्य आणू शकते ! – सुराज्य अभियान November 18, 2024 Please enter followup Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment. Followup Date*Contacted By*Contact Status*Contacted on phoneContacted personally visitingContacted by other meansNot taking phone / phone switched offTold will call later and not responding after thatPhone no given is wrong / not existingSince they are in foreign countries, cannot call; and not responding to mailboxesSince not taking phone, contacted through mail, but no response alsoCould not contact properly due to network congestion, low volumeMeeting DateMeeting Time (Enter in 24 hour format only)Contact ResponsePendingSample Response 1Sample Response 2Status of Participation
मतदारांना लुटणार्या ‘खाजगी ट्रॅव्हल्स’वर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी ! – सुराज्य अभियान November 21, 2024
‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी जनआंदोलन उभारण्याचा करण्यात आला संकल्प ! November 19, 2024