हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवण्यात आलेल्या मालेगाव बाँबस्फोट आणि समझौता एक्सप्रेस प्रकरणांचे केले होते अन्वेषण !
|
नवी देहली – पाकिस्तानी जिहादी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबा हिला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची (एन्.आय.ए.च्या) गोपनीय कागदपत्रे पुरवल्याच्या प्रकरणी या यंत्रणेचे हिमाचल प्रदेशमधील आय.पी.एस्. अधिकारी अरविंद दिग्विजय नेगी यांना यंत्रणेकडूनच अटक करण्यात आली. नेगी हे शिमला येथे एन्.आय.ए.चे अतिरिक्त अधीक्षक पदावर कार्यरत होते. त्यांनी लष्कर-ए-तोयबाच्या एका स्थानिक आतंकवाद्याला गोपनीय कागदपत्रे दिली होती.
IPS अफसर गिरफ्तार: आतंकियों को दे रहे थे गोपनीय जानकारी, NIA में सर्विस-मेडल से सम्मानित… | IPS officer Arvind Digvijay Negi arrested, was giving confidential information to terrorists, Arvind Digvijay Negi service-medal in NIA, https://t.co/ZI10zYRBRX
— NPG.News (@newpowergame) February 19, 2022
एन्.आय.ए.ने ६ नोव्हेंबर २०२१ या दिवशी नेगी याच्या विरोधात गुन्हा नोंदवला होता. यानंतर त्यांच्या घराची तपासणीही करण्यात आली होती. या प्रकरणी नंतर ६ जणांना अटक करण्यात आली होती.
हिंदूंना ‘आतंकवादी’ ठरवणार्या प्रकरणांचे केले होते अन्वेषण !
The NIA arrested its former SP Arvind Digvijay Negi on the charge of leaking secret documents of the agency to an accused in a case against overground workers of the terror outfit Lashkar-e-Taiba, reports @deveshpd https://t.co/9344hw5aY7
— The Hindu (@the_hindu) February 19, 2022
नेगी यांनी वर्ष २००७ मध्ये झालेल्या अजमेर दर्गा स्फोटाच्या प्रकरणात अन्वेषण केले होते. या प्रकरणात हिंदुत्वनिष्ठांचा कथित हात असल्याचे सांगितले गेले. नेगी यांनी वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणातील अन्वेषणातही त्यांचा सहभाग होता; मात्र नंतर त्यांना काढण्यात आले. समझौता एक्सप्रेस बाँबस्फोटाच्या प्रकरणात त्यांनी अन्वेषण केले होते. या प्रकरणात स्वामी असीमानंद यांना अटक करण्यात आली होती.