Menu Close

हिंदूंचे संघटन करण्यासाठी आम्ही पूर्ण सहकार्य करू ! – नितेश राणे, आमदार, भाजप

हिंदु जनजागृती समितीच्या गडकोट संवर्धन मोहिमेची घेतली नोंद

कणकवली – देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या दुरवस्थेचा प्रश्‍न  केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निदर्शनास आला आहे. त्यांनी केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांना तातडीने या प्रश्‍नी काम करण्यास सांगितले आहे. विभागाकडून याविषयी पत्र प्राप्त झाले आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराज हा आमचा राजकीय नव्हे, तर भावनिक विषय आहे. ‘हिंदूंच्या संघटनासाठी तुम्ही केव्हाही हाक मारा आम्ही पूर्ण सहकार्य करू’, अशी ग्वाही भाजपचे आमदार नितेश राणे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांना दिली.

आमदार नितेश राणे यांना विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाविषयी निवेदन देतांना डावीकडे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयवंत सामंत आणि उजवीकडे डॉ. नितीन ढवण

हिंदु जनजागृती समितीने गडकोट संवर्धन मोहिमेच्या अंतर्गत राबवलेल्या विजयदुर्ग किल्ला संवर्धन मोहिमेची नोंद आमदार नितेश राणे यांनी घेत समितीच्या येथील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. त्यानंतर समितीचे डॉ. नितीन ढवण, सर्वश्री जयवंत सामंत आणि मिलिंद पारकर यांनी आमदार राणे यांची कुडाळ तालुक्यातील पडवे येथील राणे यांच्या ‘लाईफटाईम हॉस्पिटल’च्या कार्यालयात भेट घेतली. या वेळी आमदार राणे यांना हिंदु जनजागृती समितीचे कार्य आणि समितीने हाती घेतलेल्या राज्यातील ‘गडकोट संवर्धन मोहिमे’ची माहिती  देण्यात आली, तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवेदन देऊन स्थानिक आमदार म्हणून याविषयी पाठपुरावा करावा, अशी विनंती करण्यात आली.

या वेळी आमदार राणे म्हणाले…

१. आपण हिंदू संघटित नसल्याने धर्मांधांचे फावते आणि ते कुरघोडी करतात. ‘लव्ह जिहाद’सारखे प्रकार त्यामुळे फोफावत आहेत. सर्वत्र शाळांमध्ये मुले गणवेश परिधान  करतात; मात्र काही जणांकडून ‘ हिजाब’चा आग्रह धरला जात आहे.

२. विशिष्ट समाजाकडून ‘आपली संख्या घटवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीकरण चालू केले’, असा अपप्रचार केला जातो. आता थेट आतंकवादी आक्रमण करण्यापेक्षा स्वत:ची लोकसंख्या वाढवून विशिष्ट समजाकडून दबाव निर्माण केला जात आहे.

३. ही स्थिती पालटण्यासाठी सर्व हिंदु संघटनांनी एकत्र येऊन कार्य करायला हवे. हिंदूंमध्ये जागृती व्हायला हवी. हिंदूंचे संघटन करण्यासाठी जेथे आवश्यकता असेल, तेथे तुम्ही आम्हाला बोलवा, आपण अवश्य सहकार्य करू.

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनाच्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील ! – आमदार राणे 

नितेश राणे, आमदार, भाजप

विजयदुर्ग किल्ला हा माझ्या मतदारसंघातील किल्ला असून छत्रपती शिवराय हा आमच्या आस्थेचा विषय आहे. याविषयी समिती करत असलेल्या कार्यात माझे पूर्ण सहकार्य राहील. विजयदुर्ग किल्ल्याच्या पहाणीसाठी जेव्हा पुरातत्व विभागाची समिती येईल, तेव्हा हिंदु जनजागृती समितीलाही आमंत्रित करू, असे आमदार राणे यांनी या वेळी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *