सुराज्य अभियानाचे निवेदन
बेळगाव – भारतीय चलन पद्धतीनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनात आणलेली १० रुपयांची नाणी वैध असतांना समाजात पसरलेल्या अपसमजांमुळे अनेक दुकानदार, विक्रेते आणि समाजातील अन्य लोक ही नाणी घेण्याचे नाकारतात. ही नाणी खोटी असल्याचे सांगून त्याऐवजी १० रुपयांची चलनी नोट देण्यासाठी अडवणूक करतात. तरी दुकानदार आणि विक्रेते यांना १० रुपयांची नाणी स्वीकारण्याचे आदेश द्यावेत, या मागणीसाठी १८ फेब्रुवारी या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या अंतर्गत असलेल्या स्वराज्य अभियानाच्या वतीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. हे निवेदन उपजिल्हाधिकारी अशोक दुडगुंटि यांनी स्वीकारले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुधीर हेरेकर, उज्ज्वला गावडे, धर्मप्रेमी श्री. मारुति सुतार, सौ. मिलन पवार, हमारा देश संघटनेचे श्री. मल्लिकार्जुन कोकणे उपस्थित होते. यानंतर बेळगाव येथील कॅनरा बँकेचे ‘असिस्टंट जनरल मॅनेजर’ श्री. अशोक एस्. कुंभार आणि विभागीय व्यवस्थापक श्री. सुधींद्र कुलकर्णी यांनाही निवेदन देण्यात आले.