Menu Close

पतीला सोडून प्रियकरासमवेत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये रहाण्यास विरोध केल्याने मुलीकडून आईची हत्या !

मुलगी आणि तिचा प्रियकर यांना अटक

अनैतिकतेमुळे देश किती अधोगतीला गेला आहे, हेच ही घटना दर्शवते ! सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला साधना न शिकवल्याचा हा परिणाम होय !

देहली – येथील आंबेडकरनगरमध्ये रहाणार्‍या आणि भाजपकडून नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवणार्‍या सुधा रानी (वय ५५ वर्षे) यांची त्यांच्या मुलीने आणि तिच्या प्रियकराने हत्या केली. या प्रकरणी मुलगी देवयानी आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील तिचा प्रियकर कार्तिक यांना पोलिसांनी अटक केली आहे.

देवयानी तिच्या पतीला सोडून कार्तिक याच्यासमवेत दक्षिणपुरी येथे रहात होती. हे तिच्या आईला मान्य नव्हते. मुलीला संपत्तीत वाटा देणार नसल्याचे सुधा रानी यांनी सांगितले होते. यामुळेच देवयानी हिने प्रियकराच्या साहाय्याने तिची हत्या केली. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा बनावही तिने रचला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *