Menu Close

नवा जिहादी जॉन पूर्वाश्रमीचा हिंदु तरुण असल्याचे सिद्ध !

धर्माचरणाअभावी हिंदू स्वतःच्या धर्माचा त्याग करून आतंकवादी कृत्ये करत आहेत, यासाठी जगभरातील हिंदूंना धर्मशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे !

jihadi_john_2837632f

लंडन : इसिसमधील नवीन जिहादी जॉन (इसिसविरोधी लोकांचा शिरच्छेद करणार्‍या आतंकवाद्याचे नाव जॉन होते. तो मूळचा ब्रिटिश नागरिक होता. तो ठार झाल्यावर दुसरा आतंकवादी शिरच्छेद करू लागला आहे.) हा पूर्वाश्रमीचा हिंदू तरुण सिद्धार्थ धर असल्याचे सिद्ध झाले आहे. काही काळासाठी इसिसच्या कह्यात असलेल्या निहाद बरकत या याझिदी तरुणीने सिद्धार्थ याने तिचे अपहरण केल्याची माहिती दिली आहे. बरकत हिला शारीरिक संबंधासाठी गुलाम म्हणून राबवण्यात आले होते.

सिद्धार्थ या मूळच्या ब्रिटीश हिंदु तरुणाने आता इस्लाम धर्म स्वीकारला असून अबु रुमायसाह असे नाव धारण केले आहे. ब्रिटनमध्ये जामिनावर असलेल्या सिद्धार्थ याने ब्रिटीश पोलिसांना गुंगारा देत बायको-मुलांसहित वर्ष २०१४ मध्ये सिरियात प्रवेश केला होता. बरकतने दिलेल्या मुलाखतीमध्ये सिद्धार्थसहित इतर विदेशी आतंकवाद्यांनी तिला गुलाम बनवल्याची माहिती दिली आहे.

सिद्धार्थ धर हा ब्रिटनच्या फरार आतंकवाद्यांच्या सूचीमध्ये आहे. सिद्धार्थ याला याआधी ब्रिटनमध्ये साधारणतः सहा वेळा अटक करण्यात आली होती; मात्र त्याला जामिनावरही सोडण्यात आले होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *