Menu Close

कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी घेतली भेट !

स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२२’ दाखवतांना श्री. सुदर्शन गुप्ता

देहली – देहली येथे कर्नाटकमधील पेजावर मठाचे अध्यक्ष आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सदस्य स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांची सनातन संस्थेचे साधक अन् हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी १४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी भेट घेतली. या वेळी सनातनचे साधक श्री. सुदर्शन गुप्ता आणि हिंदु जनजागृती समितीचे देहली प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे उपस्थित होते.

या प्रसंगी स्वामीजींना हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग २०२२’ आणि ग्रंथ भेट देण्यात आले. या वेळी स्वामी विश्व प्रसन्नातीर्थजी महाराज यांनी ‘मला सनातन संस्थेचे कार्य ठाऊक आहे’, असे सांगत साधकांना आशीर्वाद आणि प्रसाद दिला.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *