कर्नाटक येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याची हत्या झाल्याचे प्रकरण !
अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून कारवाई का करत नाही ?
मिरज – कर्नाटक मधील शिवमोग्गा येथे बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याची निर्घृण हत्या करण्यात आली. याचा आम्ही निषेध करतो. समाजात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’सारख्या जिहादी मानसिकता असलेल्या संघटनांकडून समाजात विष पसरवण्याचे काम चालू आहे. त्याचाच परिपाक म्हणून हर्षाची हत्या झाली. तरी ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’, ‘कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया’आणि ‘सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ इंडिया’, अशा संघटनांवर बंदी घालावी, या मागणीचे राष्ट्रपतींच्या नावे असलेले निवेदन बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने मिरज प्रांत कार्यालयात २२ फेब्रुवारी या दिवशी देण्यात आले. हे निवेदन प्रांत कार्यालयात नारायण मोरे यांनी स्वीकारले. या वेळी बजरंग दलाचे मिरज तालुका संयोजक श्री. आकाश जाधव, सर्वश्री शिवराज कबाडे, सागर कुंभार, सौरभ मोहिते, संदीप नाईक, दीपक हेलवाडे, कौस्तुभ गुरव उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, भारतात घडलेल्या वर्ष १९४६ च्या ‘डायरेक्ट ॲक्शन’ चळवळीशी साधर्म्य असलेल्या या सर्व मानसिकतेवर कायद्याने कठोर कारवाई करावी आणि आरोपींना तात्काळ शिक्षा व्हावी. या संघटनांची पाळेमुळे महाराष्ट्रतही खोलवर रुजलेली आहेत. त्यावर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा; अन्यथा विश्व हिंदु परिषद, बजरंग दल कायदेशीर आणि संवैधानिक मार्गाने याला उत्तर देईल. अशांचा पायबंद न झाल्यास हिंदू समाज आणि हिंदु नेतृत्व त्यांना वठणीवर आणण्यासाठी सक्षम आहे.