मुळात या संघटनेवर बंदी असतांना तिची ही माध्यमे भारतात कधीपासून चालू आहेत ? त्यांच्यावर आधीच का बंदी घालण्यात आली नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – केंद्र सरकारने बंदी घालण्यात आलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ (एस्.एफ्.जे.) हिच्याशी संबंधित अॅप, संकेतस्थळे आणि सामाजिक माध्यमांवरील खाती बंद करण्याचा आदेश दिला आहे. ही संघटना पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत या माध्यमांचा वापर करून षड्यंत्र रचत असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
Centre orders blocking of apps, website and social media accounts of “Punjab Politics TV” having close links with #SikhsForJustice https://t.co/tyUmDXcLqc
— Zee News English (@ZeeNewsEnglish) February 22, 2022