Menu Close

हर्ष यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’ फेसबूक पानाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद

वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांना दिली होती धमकी !

मंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर ‘मंगळुरू मुस्लिम’ नावाच्या फेसबूक पानावर अवमानकारक पोस्ट प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःहून गुन्हा नोंदवला आहे. या पोस्टमध्ये हर्ष यांचा उल्लेख ‘शिवमोग्गाच्या गल्लीतला कुत्रा’ असा करण्यात आला आहे.

हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यानंतर हे पान काही काळ बंद करण्यात आले होते. आता पुन्हा ते चालू झाले आहे. वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्‍याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *