राज्यात भाजपचे सरकार असतांनाही हिंदूंच्या हत्या थांबलेल्या नाहीत ! – सिम्हा
भाजपच्या खासदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांचे सरकार असल्यामुळे या संघटनांवर बंदी आणण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करावा ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
बेंगळुरू (कर्नाटक) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या मृत्यूनंतर मला लाज वाटत आहे की, कर्नाटकात भाजपचे सरकार असतांनाही हिंदु कार्यकर्त्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. केवळ काही लोकांना अटक करणे पुरेसे नाही, तर ज्या प्रमाणे भाग्यनगर येथे बलात्कार्यांच्या विषयी (बलात्कार्यांना पोलीस चकमकीत ठार करण्यात आले.) करण्यात आले, तसे पाऊल उचलले, तर या लोकांना योग्य धडा मिळेल, असे विधान भाजपचे म्हैसुरू येथील खासदार प्रताप सिम्हा यांनी केले आहे. तसेच त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) यांच्यावर बंदी घालण्याची मागणी केली. भाग्यनगर येथे एका महिला डॉक्टर सामूहिक बलात्कार झाल्यानंतर या प्रकरणी अटक करण्यात आलेले आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यांना रोखतांना पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात ते ठार झाले होते.
Karnataka govt must ban SDPI and KFD: BJP MP Pratap Simha furious over the repeated killing of party Karyakartashttps://t.co/3xBw4btdyj
— OpIndia.com (@OpIndia_com) February 22, 2022
प्रताप सिम्हा यांनी मांडलेली सूत्रे
काँग्रेसच्या काळातही झाल्या हत्या !
यापूर्वी कर्नाटकातील बंटवाळ येथे प्रशांत पुजारी, सूरतकल येथे दीपक राव, बेंगळुरू येथे संतोष, म्हैसुरू येथे राजू, कुशलनगर येथे प्रवीण पुजारी, उत्तर कन्नडमध्ये परेश मेश्टू यांच्या हत्या झाल्या आहेत. या हत्या काँग्रेसच्या काळात झाल्या. तेव्हाही सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.) आणि कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी (के.एफ्डी) या संघटनांच्या जिहाद्यांनी हत्या केल्याचे आरोप करण्यात आले होते.
यापूर्वीच बंदी घातली असती, तर आता अशा घटना घडल्या नसत्या !
राज्यात सत्तापालट झाले आणि आपले (भाजपचे) सरकार आले. बेंगळुरूच्या डीजी हळ्ळी आणि केजी हळ्ळी येथील दंगलीत पोलीस आणि सामान्य लोक यांना धर्मांधांनी लक्ष्य केले, तेव्हा ‘एस्.डी.पी.आय.आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय) यांच्यावर बंदी घालण्यात येईल’, असे सांगण्यात आले. जर त्यांच्यावर तेव्हाच बंदी घातली गेली असती, तर आज अशा प्रकारच्या घटना घडल्या असत्या का ?
केवळ आरोप करण्यासाठी सत्ता मिळालेली नाही !
जर आम्ही केवळ एस्.डी.पी.आय. आणि पी.एफ्.आय. यांच्यावर केवळ आरोपच करत रहाणार असू, तर आपल्या कार्यकर्त्यांनी यासाठी आम्हाला सत्ता दिली आहे का ? कार्यकर्ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवत आहेत; कारण त्यांना सर्वकाही ठाऊक आहे.