काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद होऊन ३० वर्षे झाल्यानंतर चित्रपट बनवला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंवर झालेले अशा प्रकारचे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यास निष्क्रीय रहाणार्या हिंदूंवर सातत्याने धर्मांध आक्रमण करत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
मुंबई – दिग्दर्शक विवेक रंजन अग्नीहोत्री यांचा काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर आधारित ‘द कश्मीर फाइल्स’ या आगामी चित्रपटाचे विज्ञापन (ट्रेलर) प्रदर्शित करण्यात आले आहे. हा चित्रपट ११ मार्च २०२२ या दिवशी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये हिंदूंचा झालेला वंशविच्छेद आणि त्यांचे पलायन यांची माहिती देण्यात आली आहे. या चित्रपटात हिंदु मुलांची हत्या, महिलांवर बलात्कार, तसेच मुसलमान जमावाकडून होणारे अमानुष अत्याचार दाखवण्यात आले आहे. या चित्रपटामध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्ती, अनुपम खेर, पुनीत इस्सर, पल्लवी जोशी आणि दर्शन कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
The gut-wrenching trailer of Vivek Agnihotri’s ‘The Kashmir Files’ released, social media users call it a ‘must watch’https://t.co/0NJchCgYfE
— OpIndia.com (@OpIndia_com) February 21, 2022
ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले प्रसंग
१. मुसलमानांची एक सभा दाखवण्यात आली आहे. त्या वेळी भिंतीवर ‘मुसलमानांनो जागे व्हा’, असे लिहिल्याचे दिसत आहे. त्या वेळी मुसलमानांचा नेता उपस्थित लोकांची संख्या मोजतांना दाखवला आहे.
२. अन्य एक नेता दुसर्या प्रसंगात म्हणत आहे की, ‘त्याने २० ते २५ हिंदूंना ठार केले. ‘त्याच्या’ सांगण्यावरून मी माझ्या भावाला किंवा आईलाही मारले असते.’
३. एक मुसलमान म्हणत आहे की, ‘हिंदूंना कुणीही पळवून लावले नाही, तर ते स्वतः राज्यपाल (जनमोहन) यांच्या साहाय्याने पळून गेले.’
४. ‘जेथे शिव, सरस्वति, ऋषि कश्यप झाले तो काश्मीर आमचा आहे. जेथे पंचतंत्र लिहिण्यात आले, तो आमचा काश्मीर आहे’, असे एका हिंदूला म्हणतांना दाखवले आहे.
५. अन्य एक हिंदू म्हणतो, ‘पद्मश्री’ पुरस्कार तुम्हाला गप्प रहाण्यासाठी दिला होता.’ यातून ‘हिंदूंवर अत्याचार होऊनही काश्मिरी हिंदूंनी बंदूक हातात घेतली नाही’, असे दर्शवण्यात आले आहे.