Menu Close

गुरुग्राम (हरियाणा) येथे मदरशामध्ये २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणार्‍या मौलवीसह ९ जणांना अटक

बलात्काराचा व्हिडिओ बनवून तो प्रसारित करण्याची धमकी देऊन १० लाख रुपये उकळण्याचाही प्रयत्न !

  • मदरशांमध्ये येणार्‍या मुली हिजाब घालून येत असतांनाही त्यांच्यावर अशा प्रकारचे सामूहिक बलात्कार मौलवींकडूनच होतात, याविषयी मुसलमानांचे नेते का बोलत नाहीत ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • शरीयत कायद्यानुसार विविध सवलती देण्याची मागणी करणारे अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांना दगड मारण्याची शिक्षा देण्याची मागणी करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

(प्रतिकात्मक चित्र)

गुरुग्राम (हरियाणा) – येथे २ अल्पवयीन मुलींवर मदरशामध्ये सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मदरशाचा मौलवी (इस्लामचे धार्मिक नेते) महंमद हसन आणि अन्य ८ जण यांना अटक केली आहे. या आरोपींनी बलात्कार करतांनाच व्हिडिओही बनवला होता. हा व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितांच्या कुटुंबियांकडून १० लाख रुपये मागितले होते. कुटुंबियांनी पैसे न दिल्याने आरोपींनी हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारितही केला होता. हा व्हिडिओ यातील एका मुलीच्या वडिलांनी पाहिल्यावर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी वरील कारवाई केली. या दोन्ही मुली मदरशांमध्ये इस्लामचे शिक्षण घेण्यासाठी जात होत्या.

मौलवी महंमद हसन याचे नातेवाईक तय्यब आणि वारिस नेहमी या मदरशांमध्ये जात. हे मौलवीला पैसे देऊन येथे शिकणार्‍या मुलींवर बलात्कार करत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी या दोघांसह जाहुलहक, फखरुद्दीन, मुस्तक, यूनुस आणि मुस्तफा यांनाही अटक करण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *