कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांची स्पष्टोक्ती
हत्येच्या मुळापर्यंत जाण्याचे आश्वासन !
बेंगळुरू (कर्नाटक) – हर्ष, ज्याला ‘हर्षा हिंदू’ या नावानेही ओळखले जात होते, तो एक हिंदु कार्यकर्ता होता. तो सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सर्वांत पुढे असायचा. त्याने नुकतेच हिंदूंच्या संदर्भातील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे काही लोक चिडले होते. काही स्थानिक लोकही त्याच्या विरोधात होते. त्यातून त्याची हत्या करण्यात आली. ही हत्या फारच भायनक होती. हे कट्टर शत्रूत्व असून ते एक लहान मुलावर दाखवण्यात आले आहे. हर्ष याच्या हत्येमागील सर्वांत मोठे कारण म्हणजे तो एक हिंदु कार्यकर्ता होता आणि निडरपणे आवाज उठवत होता, असे प्रतिपादन कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केले. ‘योजनाबद्धरित्या केलेल्या या हत्येच्या मुळापर्यंत जाऊ’, असे आश्वासनही बोम्माई यांनी या वेळी दिले.
सौजन्य रिपब्लिक टीवी