Menu Close

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ८ धर्मांधांना अटक

यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

अटक केलेले आरोपी

शिवमोग्गा (कर्नाटक) – बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत ८ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी यातील ६ आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एकूण १२ जणांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर ८ जणांना अटक करण्यात आली. या आरोपी २० ते २२ वर्षांचे आहेत.

१. वर्ष २०१६-१७ मध्ये हर्ष यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. हर्ष यांची हत्या करण्यामध्ये रियाज, मुजाहिद, कासिफ आणि आसिफ यांचा सहभाग होता, तर नदीम आणि अफान यांनी कट रचला होता. यात कासिफ हा मुख्य सूत्रधार आहे.

२. हर्ष यांच्या हत्येनंतर शहरात हिंसाचार आणि जाळपोळ यांच्या १४ वेगवेगळ्या घटना घडल्या. ३ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस जाळपोळ आणि हिंसाचार घडवून वाहने आणि संपत्ती यांची हानी करणार्‍यांचा शोध घेत आहेत.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *