Menu Close

भारतीय ज्योतिषाने वर्तवलेल्या भविष्यानुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला २४ फेब्रुवारीला प्रारंभ

यातून भारतील ज्योतिषशास्त्र किती प्रगत आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट होते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव

नवी देहली – माझ्या गणनेनुसार वाटाघाटी किंवा चर्चा २३ फेब्रुवारीपर्यंत होऊ शकतात आणि २४ फेब्रुवारी २०२२ नंतर कोणत्याही दिवशी युद्ध होऊ शकते. २४ फेब्रुवारीनंतर चर्चा अयशस्वी होईल. ग्रह आणि नक्षत्र यांनुसार रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध कधीही चालू होऊ शकते. त्यातही ते २४ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२२ या काळात हे युद्ध होऊ शकते. यात युक्रेनची हानी होईल. ही परिस्थिती १५ मार्च ते ५ मे २०२२ या काळात नियंत्रणात येऊ शकते, अशा प्रकारचे भविष्य ज्योतिषी पंडित संजीवकुमार श्रीवास्तव यांनी १३ फेब्रुवारी या दिवशी ट्वीट करून वर्तवले होते. त्यांनी केलेल्या भाकितानुसार २३ फेब्रुवारीच्या रात्री आणि २४ फेब्रुवारीच्या पहाटे या युद्धाला प्रारंभ झाला आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *