Menu Close

बेंगळुरू येथे महाविद्यालयाने शीख विद्यार्थिनीला पगडी काढण्यास सांगितल्याने शीख धर्मीय संतप्त

बेंगळुरू (कर्नाटक) – येथील एका महाविद्यालयातील प्रशासनाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा आदेशाचा संदर्भ देत माऊंट कॉर्मेल पियू कॉलेजमधील विद्यार्थिनीला ‘तुर्बान’ अर्थात् पगडी उतरवण्यास सांगितले. या वेळी विद्यार्थिनीने पगडी काढण्यास नकार दिला. त्यानंतर प्रशासनाने तिच्या वडिलांशी चर्चा केली. ‘एका शीख व्यक्तीची पगडीवर किती श्रद्धा असते हे आम्ही जाणून आहोत; मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे आमचे हात बांधलेले आहेत’, असे प्रशासनाने मुलीच्या वडिलांना सांगितले.

या घटनेमुळे शीख समुदाय आक्रमक झाला. ‘एखाद्या शीख व्यक्तीला पगडी काढण्यास सांगणे, हा शीख धर्माचा अपमान आहे. आमची एकच मागणी आहे की, देशात पूर्वीपासून प्रचलित असणार्‍या प्रथांना अनुमती द्यावी. त्यामुळे लोकांना त्रास होणार नाही’, असे शीख धर्माच्या लोकांनी सांगितले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *