Menu Close

धुळे येथे फेसबूकद्वारे छत्रपती शिवरायांचा इतिहास दर्शवल्याच्या प्रकरणी ४ हिंदुत्वनिष्ठांना अटक !

  • चोर सोडून संन्याशाला शिक्षा करणारी हिंदुद्रोही सरकारी यंत्रणा !
  • छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात समाज माध्यमांवर त्यांचा इतिहास प्रसारित करणार्‍यांवर कारवाई केली जाते, हे संतापजनक !
  • आज छत्रपती शिवरायांचा इतिहास प्रसारित करण्यास मज्जाव करणारे पोलीस उद्या त्यांची जयंती साजरी करण्यावर निर्बंध आणतील, हे जाणा ! अशांना हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक !

धुळे  – छत्रपती शिवाजी महाराज कसायाचे हात कापतांनाचा इतिहास फेसबूकद्वारे प्रसारित केल्याच्या प्रकरणी येथील गोरक्षक श्री. संजय शर्मा यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यासह या फलकाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याने प्रणिल मंडलिक, जयेश पाटील आणि प्रदीप जाधव या हिंदुत्वनिष्ठांनाही पोलिसांनी अटक केली. या सर्वांवर कलम ‘१५३ ब’ अन्वये कारवाई करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या निमित्ताने झालेल्या एका घटनेनंतर ही कारवाई करण्यात आली.

‘श्रीराम जन्मोत्सव समिती’च्या वतीने धुळे शहरातील महानगरपालिका चौकात छत्रपती शिवाजी महाराज कसायाचे हात कापतांनाचा फलक लावला होता. धुळे महानगरपालिकेने हा फलक आणि अन्य काही फलक अनधिकृत असल्याच्या कारणावरून ते काढले. त्यानंतर धर्मांधांनी ‘आमच्या ताकदीमुळे फलक हटवला’ अशा आशयाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित केला. एवढेच नव्हे, तर काही मुजोर धर्मांधांनी ‘आमचे या शहरावर कसे राज्य चालते आणि आम्ही कशा पद्धतीने हा फलक काढण्यास भाग पाडले’, अशा आशयाचा मजकूरही सामाजिक माध्यमांतून प्रसारित केला. त्यानंतर हा वाद चिघळला. (फलक काढण्याची पोलिसांची तत्परता अशा वेळी कुठे जाते ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

हिंदुत्वनिष्ठांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याची चेतावणी

यानंतर ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’ या संघटनेने ‘दोषींवर कारवाई करण्याचे सोडून खरा इतिहास मांडणार्‍या हिंदुत्ववनिष्ठांवर मात्र कारवाई करण्यात आल्याचे सांगत निषेध व्यक्त केला. यासह हिंदुत्वनिष्ठांवरी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करू’, अशी चेतावणीही हिंदुत्वनिष्ठांनी दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *