Menu Close

चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा सुफी शेख याला अटक !

धर्मांधांचा वाढता उद्दामपणा आणि अत्याचार दर्शवणारी भारतभरातील वृत्ते !

धर्मांतरासाठी बळजोरी आणि पैसेही उकळले !

  • भारतात धर्मांधांचा वाढता उन्माद रोखण्यासाठी सरकारी यंत्रणांनी पावले उचलावीत !
  • अंनिस या धर्मांधांविरुद्ध का कृती करत नाही ? कि ती त्यांना घाबरते ?

प्रतिकात्मक छायाचित्र

नाशिक – भोंदूबाबा सुफी अब्दुल शेख याने त्याचा भाऊ जब्बार शेख याच्यासह एक पीडिता, तिच्या २ बहिणी आणि आई यांच्यावर २ वर्षे ४ मास लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. पाण्यातून गुंगीचे औषध देऊन आणि चाकूचा धाक दाखवून हे अत्याचार करण्यात आले. त्याने या अत्याचाराचे चित्रीकरण करून पीडितांना धमकावून हे अत्याचार चालूच ठेवले, तसेच धर्मांतर करण्यासाठीही तो बळजोरी करत होता, असे ‘सकाळ’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर म्हटले आहे. या हिंदु युवतींच्या मनात हिंदु धर्माविषयी द्वेष निर्माण करून तो त्यांना धर्मांतर करण्यासही सांगत होता, असेही या वृत्तात म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर शेख त्यांच्याजवळ सतत पैशांची मागणीही करत असे. आतापर्यंत शेख याने या पीडितांकडून ८ लाख रुपये उकळल्याचे ‘टी.व्ही. ९’च्या वृत्तात म्हटले आहे.

नागडे गावातील एका युवतीचा विवाह जमत नसल्याने या पीडितेची आई भोंदूबाबा शेख याच्याकडे तिला घेऊन गेली होती. ‘मुलीवर जादूटोणा करण्यात आला आहे’, असे सांगून शेख याने त्याच्याकडे मुलीला पूजेसाठी बोलावले. मुलगी आणि तिची आई यांच्या अंधश्रद्धेचा अपलाभ घेत शेख याने मुलीवर अत्याचार केले. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात २३ फेब्रुवारी या दिवशी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांनी शेख याला अटक केली आहे.

‘साम टी.व्ही.’कडून भगवा पोशाख परिधान केलेल्याचे चित्र प्रसारित करून दोषी व्यक्ती ‘हिंदु’ असल्याचे भासवण्याचा प्रयत्न !

‘साम टी.व्ही.’ने शेख याचा ‘भोंदूबाबा’ असा उल्लेख केला.  हे वृत्त देतांना हाताने काढलेले एक चित्र त्यासमवेत जोडण्यात आले आहे. या चित्रात भगवा पोषाख परिधान केलेल्या साधूची दोन स्त्रिया सेवा करत आहेत, असे दाखवण्यात आले आहे. याद्वारे सदर व्यक्ती ‘हिंदु’ असल्याचे भासवले आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *