केरळमध्ये धर्मांधप्रेमी साम्यवादी सरकार असल्याने अशा वासनांधांना कठोर शिक्षा होण्याची शक्यता अल्प आहे. त्यामुळे अशांना फाशीची शिक्षा होण्यासाठी आता जनतेनेच दबाव निर्माण केला पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
मलप्पूरम् (केरळ) – येथील कावानूर गावामध्ये एका दिव्यांग (विकलांग) मुलीवर तिच्या आईसमोरच बलात्कार करणार्या मुत्तलन शिहाब याला अटक करण्यात आली आहे. पीडितेची आई आजरी असल्याने ती पलंगावरून ऊठू शकत नसल्याचा अपलाभ शिहाब याने उठवला. पीडित कुटुंबियांना भीती आहे की, शिहाब कारागृहातून सुटल्यावर तो त्यांच्यावर सूड उगवू शकतो.
केरल: दिव्यांग बेटी का बीमार माँ के सामने रेप, पीड़ित परिवार को शिहाब की जमानत के बाद ‘बदले’ का डर#Kerala #Rape https://t.co/9hWdcp9lk5
— ऑपइंडिया (@OpIndia_in) February 25, 2022
(‘केंद्र सरकारच्या आदेशानुसार सर्वत्र अपंग, विकलांग यांना ‘दिव्यांग’ असा शब्दप्रयोग सध्या प्रचलित करण्यात आला आहे. अध्यात्माच्या दृष्टीने दिव्यांगाचा अर्थ पाहिल्यास ‘दिव्य + अंग = दिव्यांग’ होय. दिव्य म्हणजे दैवी किंवा सूक्ष्म (म्हणजे लौकिकदृष्ट्या डोळ्यांना न दिसणारे) होय. यावरून दिव्यांग या शब्दाचा अर्थ ‘दैवी किंवा डोळ्यांना न दिसणारे सूक्ष्म अंग’ असाही होतो. त्यामुळे अपंग किंवा विकलांग या शब्दांसाठी दिव्यांग शब्द वापरणे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्य ठरते.’)
0 Comments