|
|
कर्नूल – जिल्ह्यातील आत्मकूर येथील पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात सहभागी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार शेख अथाउल्लाह याला अटक केली. अथाउल्लाह हा पोलीसदलातील विशेष पोलीस पथकात कार्यरत आहे. विशेष म्हणजे तो कर्तव्यावर असतांनाच त्याने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले. या आक्रमणामागे जिहादी आतंकवादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या ‘सोशल डेमोक्रॅटिक फ्रंट ऑफ इंडिया’चा (एस्.डी.पी.आय.चा) हात असल्याची माहिती पुढे आली आहे.
Andhra Pradesh: Head constable Shaik Athavullah arrested in police station attack, orchestrated by SDPI, after Hindus objected to construction of illegal mosquehttps://t.co/Lt27aYfCrT
— OpIndia.com (@OpIndia_com) February 26, 2022
१. ही घटना ८ जानेवारी २०२२ या दिवशी घडली होती. येथे एका अवैधरित्या उभारण्यात येणार्या मशिदीला हिंदूंनी विरोध केला. त्या रागातून धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. (धर्मांधांच्या अवैध गोष्टींना विरोध केल्यावर ते थेट कायदा हातात घेतात. सरकारने अशांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
२. या वेळी धर्मांधांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केली, तसेच पोलीस ठाण्याच्या बाहेर असलेल्या दुचाकी वाहनांचीही तोडफोड केली.
३. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला. या आक्रमणात अनेक पोलीस गंभीररित्या घायाळ झाले होते.
४. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत २८ जणांना अटक केली. यांतील बहुतांश जण एस्.डी.पी.आय.चे सदस्य आहेत.
५. जमाव पोलीस ठाण्यावर आक्रमण करत असतांना अथाउल्लाह या जमावामध्ये सहभागी झाला. गुप्तचर विभागाला हाती लागलेल्या व्हिडिओतून ही माहिती समोर आली. वास्तविक त्या वेळी मुख्यमंत्र्याच्या ‘कॅम्प कार्यालया’त त्याने कर्तव्यावर असणे आवश्यक होते; मात्र तेथे न जाता तो पोलीस ठाण्यावर आक्रमण करण्यात सहभागी झाला.
७. ‘पोलीस ठाण्यावर आक्रमण झाले, त्या दिवशी अथाउल्लाह हा कामावर नव्हता, तर तो सुटीवर होता. त्या वेळी पोलीसदलाने त्याच्याऐवजी अन्य पोलिसाला कामाच्या ठिकाणी नियुक्त केले नव्हते’, अशी खोटी कागदपत्रे बनवण्याचा काही पोलीस अधिकार्यांनी प्रयत्न केला. (अशा पोलिसांना बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा करणे आवश्यक ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यांचा हा कट यशस्वी झाला नाही.