रशियाशी चर्चेला सिद्ध; परंतु बेलारूस येथे नाही ! – युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की February 28, 2022 Share On : व्लोदिमिर झेलेंस्की कीव (युक्रेन) – रशियाशी चर्चेसाठी सिद्ध आहे; परंतु बेलारूसमध्ये नाही, असे युक्रेनचे राष्ट्रध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी म्हटले आहे. रशियाने बेलारूसच्या बेलारशियन प्रदेशातून युक्रेनवर आक्रमण केले नसते, तर त्यांच्या मिन्स्क शहरामध्ये चर्चा होऊ शकली असती, असे झेलेंस्की म्हणाले. रशियाने युक्रेनला बेलारूसमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले होते; मात्र युक्रेनने रशियाची अट नाकारत चर्चा करण्यास नकार दिला आहे. झेलेंस्की यांनी सांगितले की, आम्ही वॉर्सा (पोलंड), ब्रातिस्लाव्हा (स्लोव्हाकिया), बुडापोस्ट (हंगेरी), इस्तंबूल (तुर्कस्तान) आणि बाकू (अझरबैजान) यांपैकी कोणत्याही ठिकाणी चर्चेस सिद्ध आहोत. Ukrainian President Volodymyr Zelenskiy rejected the Kremlin’s offer of talks in #Belarus and named Warsaw, Bratislava, Istanbul, Budapest or Baku as alternative venues#Ukraine #RussiaUkraineConflict https://t.co/rwEg2Ag4fK — Hindustan Times (@htTweets) February 27, 2022 युक्रेनने चर्चेचा प्रस्ताव स्वीकारल्याचा रशियाच्या प्रसारमाध्यमांचा दावा रशियाच्या प्रसारमाध्यमांनी केलेल्या दाव्यानुसार युक्रेनने रशियाचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारला आहे. ‘युक्रेनचे शिष्टमंडळ बेलारूसमधील गोमेल येथे चर्चेत सहभागी होण्यासाठी मार्गस्थ झाले आहे’, असे या प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. यास युक्रेनकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार पुतीन यांनी न्यूक्लियर डिटेरन्स फोर्सला सतर्क रहाण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यातून अणूयुद्धाचा धोका संभवतो. Tags : Featured Newsआंतरराष्ट्रीयRelated Newsबांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित ! December 14, 2024 Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
बांगलादेशी हिंदूंवरील अत्याचार पाहून जागा होत नाही, तो हिंदु नव्हे – नवनीत राणा, माजी खासदार December 20, 2024
काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स December 16, 2024