इंदूर (मध्यप्रदेश) – येथे एका विवाहित हिंदु महिलेने तिचा प्रियकर रिझवान याच्या साहाय्याने पती कुशलेंद्र याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी सुनीता हिला अटक केली असून रिझवान आणि भैय्यू यांचा शोध घेतला जात आहे. आरोपींनी कुशलेंद्र यांची हत्या केल्यानंतर त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी पुरले. सुनीता हिची ओळख रिझवान याच्याशी झाली होती. या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले. यातूनच या दोघांनी कुशलेंद्र याला ठार मारण्याचे षड्यंत्र रचले. (धर्मांधांची हिंसक वृत्ती पहाता हिंदु महिलेला असे क्रौर्य धर्मांधामुळेच करता आले,असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)