‘युक्रेनमधील स्थिती सुधारावी, तेथील युद्ध समाप्त व्हावे’, असेच सहिष्णु भारतियांना वाटते. भारतातील शिवभक्तांना असे आवाहन करतांना युक्रेनच्या राजदूतांनी ‘युक्रेन नेहमीच भारताच्या विरोधात भूमिका का घेतो ?’, याचेही उत्तर द्यावे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
नवी देहली – महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्या प्रीत्यर्थ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्यासाठी भारतातील शिवभक्तांनी भगवान शंकराला प्रार्थना करावी. युद्ध थांबल्यास युक्रेनचे लोक या संकटातून बाहेर पडू शकतील, असे वक्तव्य भारतातील युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी केले आहे. इगोर पोलिखा यांनी युक्रेनमधील युद्धजीन्य स्थितीच्या संदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी भारतातील शिवभक्तांना आवाहन केले. ‘युक्रेनमध्ये दिवस-रात्र गोळीबार चालू आहे. लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. युक्रेनमध्ये अशी परिस्थिती निर्माण होणे, ही अत्यंत दुःखद गोष्ट आहे’, असेही ते म्हणाले.
सौजन्य खबरे अभीतक