Menu Close

लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ प्रशिक्षण संस्थेत हिंदुद्वेषी शिकवण !

 इस्लाम उदारमतवादी असल्यामुळे लोकांकडून इस्लामचा स्वीकार करत असल्याची शिकवण !

  • अशी शिकवण घेऊन आय.ए.एस्. झालेले अधिकारी हिंदूंवर अन्याय होत असतांना कधी तरी त्यांना साहाय्य करतील का ?

  • ‘व्हिजन आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे !

देहली – लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. त्यात विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या स्मृती शहा नावाच्या मार्गदर्शिका इस्लामविषयी शिकवतांना सांगतात, ‘‘इस्लाम उदारतावादी होता. इस्लाममध्ये समानता शिकवली जाते.

इस्लाममधील बंधूभाव आणि रूढीवाद-जातीवाद नसणे यांमुळे तो सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनला होता. त्या वेळी लोक स्वतःहून इस्लामचा स्वीकार करू लागले. अशा वेळी हिंदु धर्म इस्लामपेक्षा फार काही वेगळा नाही, हे भासवण्यासाठी ‘भक्ती आंदोलन’ आरंभण्यात आले.’’ ‘भक्ती आंदोलना’चा आरंभ वर्ष ८०० मध्ये झाला आणि हे आंदोलन साधारण वर्ष १७०० पर्यंत चालले. इस्लामचा वाढत असलेला प्रभाव आणि अत्याचार रोखण्यासाठी हे आंदोलन आरंभण्यात आले. या आंदोलनाचा प्रभाव इस्लामवरील पडला आणि सूफीवाद उदयास आला, असेही म्हटले जाते.

याच ‘व्हिजन आय.ए.एस्.’चे अन्य व्हिडिओही मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून त्यात मोगल आक्रमक अकबर याचे उदात्तीकरण करण्यात आले आहे, तसेच शबरीमला येथे १० ते ५० वर्षांच्या वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिला जात नसल्याच्या परंपरेची खिल्ली उडवण्यात आली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *