Menu Close

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

भारताच्या विनंतीचा परिणाम !

खारकीव (युक्रेन) – येथे रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते. २ मार्चच्या रात्री रशियाने यासाठी युद्ध थांबवले होते. भारताने रशियाला केलेल्या विनंतीनंतर रशियाने ही कृती केली.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ मार्चच्या रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्याशी विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याविषयी दूरभाषवरून चर्चा केल्यानंतर रशियाकडून हा निर्णय घेण्यात आला होता.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *