Menu Close

धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतींना प्रायोगिक रूप देण्याचे सनातनचे कार्य कौतुकास्पद ! – आचार्य राघवकीर्ती

आचार्य राघवकीर्ती यांना सनातनच्या उत्पादनांविषयी सांगतांना त्यांच्या डावीकडे श्री. विनय पानवळकर

उज्जैन : सध्या सर्वत्रच देवतांचे विडंबन चालू आहे. त्यात धर्मशास्त्र आणि धर्मजागृती करण्याचे सनातन संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे. मी आतापर्यंत सनातन संस्थेद्वारे उज्जैन शहरात आणि सिंहस्थक्षेत्री भिंतीवर लिहिलेली प्रबोधनात्मक वाक्ये पाहिली होती; पण सनातनचे एवढे मोठे कार्य आहे, हे मला ठाऊक नव्हते. सनातनचे कार्य जाणून आणि या प्रदर्शनात येऊन मी धन्य झालो, असे मला वाटत आहे. सनातनने धर्मशास्त्रात सांगितलेल्या कृतीना प्रायोगिक रुप दिले आहे, हे कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन श्रीमहागणपति आध्यात्मिक मिशनचे प्रमुख आचार्य राघवकीर्ती यांनी केले. सनातन आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थक्षेत्री लावण्यात आलेल्या प्रदर्शनाला २ मे या दिवशी भेट दिल्यावर ते बोलत होते. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

क्षणचित्रे

१. या वेळेस महाराजांनी गणपतीची मूर्ती प्रदर्शनाला भेट दिली.

२. सनातनचे ग्रंथ बघून महाराज प्रसन्न झाले. त्यांनी सर्व ग्रंथाची सूची अभ्यासासाठी मागून घेतली.

३. महाराज श्रीगणपतीचे उपासक असल्याने त्यांना सनातन संस्थेने बनवलेल्या सात्त्विक श्री गणेश मूर्तीविषयक माहिती देण्यात आली, तसेच भ्रमणसंगणकावर त्याचे चित्रही दाखवण्यात आले.

४. या वेळेस महाराजांनी श्रीगणपतीविषयी काही सूत्रे सांगून त्याविषयीही सनातनने संशोधन करावे, असे सुचवले.

५. त्यावर त्यांनी १८ आणि १९ मे दिवशी त्यांच्याकडून आयोजित करण्यात येणार्‍या ज्योतिष संमेलनात भाषण करण्यास निमंत्रित केले.

लव्ह जिहादाची समस्या देशासाठी भीषण ! – श्री. नारायण प्रसाद कबीरपंथी, अध्यक्ष, संत रविदास हस्तशिल्प एवं हथकरघा विकास निगम मर्यादित, मध्यप्रदेश

श्री. नारायण कबीरपंथी यांना फ्लेक्स फलकाविषयी माहिती देतांना पू. (डॉ.) पिंगळे (डावीकडे)

लव्ह जिहादाची समस्या भीषण आणि समाजाला धक्कादायक आहे, असे प्रतिपादन संत रविदास म.प्र. हस्तशिल्प एवं हथकरघा विकास निगम मर्यादितचे (कॅबिनेट मंत्री दर्जा) अध्यक्ष श्री. नारायण प्रसाद कबीरपंथी आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग, भारत शासनाचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. अनिल वर्मा यांनी केले. या वेळेस हिंदु जनजागृती समितीचे श्री. आनंद जाखोटिया यांनी सर्वश्री कबीरपंथी आणि वर्मा यांना प्रदर्शनाची माहिती सांगितली, तर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

क्षणचित्रे

१. प्रदर्शनात लावण्यात आलेले लव्ह जिहाद विषयाचे फलक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले. अनेकांनी भ्रमणभाषवरही फलकांची छायाचित्रे काढून घेतली.

२. प्रदर्शनावरील गोसंवर्धन ग्रंथ, वास्तुसंच आणि पंचगव्ययुक्त साबण त्यांना दाखवल्यावर त्यांनी लगेच ते विकत घेतले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *