Menu Close

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला विष पाजून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

अशा खुनी वासनांधांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

प्रतिकात्मक छायाचित्र

सहारनपूर (उत्तरप्रदेश) – येथे एका धर्मांधाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला विष पाजून जंगलात नेऊन फेकले. नंतर या मुलीचा उपचाराच्या वेळी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी साहिल नावाच्या तरुणाला अटक केली आहे. मृत्यूपूर्वी या मुलीने दिलेल्या माहितीवरून साहिल याला अटक करण्यात आली. मृत मुलगी आणि साहिल एकाच गावात रहाणारे आहेत. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, तेव्हा ती साहिल याच्यासमवेत होती, अशी माहिती मिळाली. कुटुंबियांनी साहिल याला विचारणा केली असता, त्याने कुटुंबियांना शिवीगाळ करत तिला जंगलात फेकल्याचे सांगितले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला जंगलातून शोधून काढून रुग्णालयात भरती केले होते.

Related News

0 Comments

  1. Uma Maheswar Nakka

    No smoke without fire, Police had registered a case against 12 persons, including Jayendra Saraswati, and the chargesheet was filed in 2006 for offences including attempt to murder and criminal conspiracy.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *