|
|
भीलवाडा (राजस्थान) – जिल्ह्यातील रूपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईजम् : धर्म या कलंक’ हे पुस्तक वाटले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्यांनी चौकशीचा आदेश दिला आहे. हे पुस्तक एल्.आर्. बाली यांनी लिहिले असून नागपूरच्या ‘समता प्रकाशन’ने ते प्रकाशित केले आहे. हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाटणार्या शिक्षिकेचे नाव निर्मला कामड असे आहे. कामड यांच्या विरोधात धरणे आंदोलन करून त्यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. यासह सामाजिक माध्यमांवरही ‘हिंदु धर्मविरोधी टीचर निर्मला कामड यांना अटक करा’ या ‘हॅशटॅग’द्वारे ‘ट्रेंड’ चालवण्यात आला. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार या शाळेचे मुख्याध्यापक मुकेश कुमार यांना असे पुस्तक वाटले जात असल्याविषयी तक्रार प्राप्त झाली आहे; परंतु ते कुणी वाटले, हे त्यांना अद्याप कळलेले नाही.
शिक्षिकेकडून श्री ब्रह्मदेव आणि श्रीराम यांच्याविषयी संतापजनक विधान !
या शाळेतील एका विद्यार्थ्याने सांगितले, ‘‘शिक्षिका कामड या सदर पुस्तक वाटत असत आणि ‘हे पुस्तक वाचा; म्हणजे जे डोक्यात आहे, ते निघून जाईल’, असे आम्हाला सांगत असत. त्या वर्गात अन्य धर्माचा प्रचारही करायच्या. त्या म्हणायच्या, ‘ब्रह्माने स्वतःच्या मुलीवर बलात्कार केला आहे. राम हे दशरथाचे पुत्रच नव्हते.’’ हे पुस्तक हिरव्या रंगात प्रकाशित करण्यात आले आहे. यावर ‘हिंदु धर्म उदार आणि सहनशील नसून जगात हिंदूंपेक्षा संकुचित व्यक्ती नाही’, असे वाक्य नेहरूंचे विचार म्हणून छापण्यात आले आहे.
Rajasthan: Govt school teacher distributes ‘Hinduism: Dharm ya Kalank’ booklet to students, parents hold protests, inquiry ordered https://t.co/x9wHB3kpX6
— OpIndia.com (@OpIndia_com) March 3, 2022
पुस्तकात भगवान श्रीविष्णु, ब्रह्मदेव, विश्वामित्र ऋषि यांच्याविषयी अशलाघ्य लिखाण !
जीतमल गुर्जर नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने या पुस्तकातील पाने सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहेत. यात लिहिले आहे, ‘विष्णु आणि कुत्रे यांत काहीही भेद नाही.’ यासह ब्रह्मदेव आणि विश्वामित्र ऋषि यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. हिंदूंच्या देवतांचा ‘खलनायक’ असाही उल्लेख करण्यात आला आहे.
(म्हणे) ‘मी दलित समाजाची असल्याने मला लक्ष्य केले जात आहे !’ – निर्मला कापड
या सर्व प्रकरणाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना निर्मला कामड म्हणाल्या, ‘‘मी निर्दोष आहे. मी दलित समाजाची असल्याने मला लक्ष्य केले जात आहे. मी चारचाकी वाहनातून येते, केस मोकळे सोडते आणि चश्मा लावते, याचा काही जणांना पुष्कळ त्रास होतो.’’