Menu Close

मध्यप्रदेश येथे अल्पवयीन मुलीला नोकरीसाठी मुसलमान होण्यास सांगणार्‍या धर्मांध तरुणाला अटक

रतलाम (मध्यप्रदेश) – येथे एका अल्पवयीन मुलीवर धर्मांतराचा दबाव आणल्याच्या प्रकरणी अरबाज खान या तरुणाला अटक करण्यात आली आहे. या दोघांची ओळख सामाजिक माध्यमांतून झाली होती. अरबाज याने या मुलीला विवाह करण्याचे आमीष दाखवले होते. त्याने बिहारमधील या मुलीला रतलाम येथे नोकरीसाठी बोलावले होते. येथील एका गृहसंकुलात त्यांनी भाड्याने घर घेण्याचा प्रयत्न केला असता दोघांचे धर्म वेगवेगळे असल्याने घर मालकास संशय आला. त्याने याविषयी पोलिसांना कळवल्यावर पोलिसांनी मुलीच्या पालकांना येथे बोलावले. या वेळी मुलीने ‘अरबाज हा मला नोकरी मिळवण्यासाठी मुसलमान होणे आवश्यक असल्याचे सांगितले’, अशी माहिती दिली. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अरबाज याला अटक केली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *