Menu Close

रशियाकडून युक्रेनमधील २ शहरांत युद्धविरामाची घोषणा !

नागरिकांना सुखरूप स्थलांतर करण्याची अनुमती

प्रातिनिधिक छायाचित्र

मॉस्को (रशिया) – रशियाने युद्धाच्या १०व्या दिवशी युक्रेनमधील मारियुपोल आणि वोलनोवाखा या २ शहरांमध्ये युद्धविराम करण्याची घोषणा केली आहे. रशियाने नागरिकांना युक्रेनमधून बाहेर पडता यावे, यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून ५ मार्च या दिवशी सकाळी ६ वाजल्यापासून युद्धविराम घोषित केला आहे. रशियन सैन्याने वेढा घातलेल्या मारियुपोल शहरांतील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची अनुमती देण्यात आली आहे.

रशियाने संयुक्त राष्ट्रांत म्हटले की, युक्रेन-रशिया सीमेवर रशियाने बस उपलब्ध करून दिल्या आहेत. याद्वारे युक्रेनमधील खारकीव आणि सुमी या शहरांमध्ये अडकून पडलेल्या परदेशी व्यक्तींना (यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचाही समावेश आहे) युक्रेनमधून बाहेर काढण्यात येणार आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *