Menu Close

तमिळनाडूत मंदिराच्या मालकीच्या भूमीत मृतदेह पुरण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

चेन्नई – तमिळनाडूतील तिरूनेलवेली जिल्ह्यातील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला. हिंदु संघटनांनी त्याला विरोध केल्यावर पाद्री आणि इतर ख्रिस्ती यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी शंकरनकोविल-तिरूनेलवेली महामार्गावर मृतदेह ठेवला. त्या वेळी धर्मांध ख्रिस्त्यांनी जलवाहिनीची तोडफोड केली. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे.

१. धर्मांध ख्रिस्त्यांच्या या कृतीमुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाल्यावर पोलीस घटनास्थळी पोचले. त्या वेळी पाद्री आणि अन्य ख्रिस्ती यांनी, ‘स्मशानभूमीसाठी ख्रिस्त्यांना जागा दिली नसल्यामुळे मृतदेह कुठे दफन करायचा ?’, असा प्रश्‍न पोलिसांना विचारला. (ख्रिस्त्यांना मृतदेहांचे दफन करण्यासाठी जागा मिळाली नाही; म्हणून मंदिराच्या मालकीच्या भूमीत ते दफन करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? अशी कृती  त्यांनी चर्चच्या मालकीच्या भूमीत का केली नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

२. त्या वेळी पोलिसांनी शांतपणे ‘आम्ही संबंधित भूमीत मृतदेह पुरण्याची अनुमती देऊ शकत नाही; कारण या भूमीचा स्मशानभूमी म्हणून वापर करण्यासाठी अनुमती असल्याचे दाखवणारी कोणतीही कागदपत्रे नाहीत’, असे सांगितले.

३. तरीही धर्मांध ख्रिस्ती ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. यानंतर पोलीस निरीक्षकांनी पाद्य्रांना निघून जाण्यास सांगितले आणि मृताच्या कुटुंबाला बोलावण्याचा निरोप दिला.

४. यामुळे चिडलेल्या धर्मांध ख्रिस्त्यांनी, ‘तुम्ही तुमच्या अधिकाराचा अपवापर करत आहात’, असे सांगितले. त्या वेळी पोलीस निरीक्षकांनी ‘कायद्याची कार्यवाही करण्यासाठी तुम्ही असलेली कृती थांबवण्याचा मला अधिकार आहे’, असे सुनावले. ‘याआधी मृत ख्रिस्त्यांना कुठे पुरले जायचे ?’, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. त्यानंतर धर्मांध ख्रिस्ती शांत झाले.

५. ‘हिंदु मुन्नानी’ (‘हिंदू आघाडीवर) या संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, ‘‘तेथील चर्च अनधिकृत आहे. पाद्री थांगा पांडी हे तेथील हिंदूंचे धर्मांतर करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. त्याने सरकारी भूमीवर अतिक्रमण करून ती पेन्टेकोस्टल चर्चची असल्याचा दावा करणारा फलक लावला होता.’’

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *