Menu Close

मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून हिंदु ट्रकचालकाची करण्यात आली हत्या !

  • हिंदु युवतीशी प्रेम केल्यामुळे धर्मांधाची हत्या झाली असती, तर सर्व पुरो(अधो)गामी, निधर्मी आणि वृत्तवाहिन्या यांनी हिंदूंना ‘तालिबानी’ ठरवले असते; पण या घटनेतील आरोपी धर्मांध असल्यामुळे ते सर्व आता गप्प आहेत, हे जाणा !
  • अशी घटना भाजपचे राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात अपेक्षित नाही, असे हिंदूंना वाटते !

हत्या करण्यात आलेला हिंदू युवक मोनू

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – मुसलमान युवतीशी प्रेम केल्यावरून तिच्या सख्या भावांनी मासूमपूर येथील ‘मोनू’ या ट्रकचालक हिंदु युवकाची गळा घोटून हत्या केली आहे. हे प्रकरण दोन धर्मांतील असल्याने गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाशी संबंधित काही युवकांना पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर त्यांना सोडून दिले होते. त्यामुळे गावकर्‍यांनी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. (याउलट आरोपी जर हिंदु असता, तर एव्हाना पोलिसांनी तात्काळ अटक केली असती. अशा पोलिसांवर सरकारने कठोर कारवाई करायला हवी. यातून पोलिसांचे धर्मांधांविषयीचे तुष्टीकरणच दिसून येते ! – संपादक दैनिक सनातन प्रभात) त्यानंतर पोलिसांनी सायंकाळी या हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या नसीम आणि त्याचा भाऊ वसीम या दोन सख्या भावांना अटक केली.

१. मृतकाचा भाऊ मोंटी याने पोलिसांना सांगितले की, त्याचा भाऊ गावातीलच एका मुसलमान युवतीशी प्रेम करत होता. यासंदर्भात जेव्हा युवतीच्या भावांना समजले, तेव्हा त्यांनी मोनूला ठार मारण्याची धमकी दिली होती. सकाळी मोनू शौचालयासाठी जंगलात गेला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. त्यानंतर त्याचा दुसर्‍या दिवशीच गावाबाहेरील एका शेतात मृतदेह मिळाला होता.

२. पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींनी हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *