Menu Close

धर्मांध आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून हिंदु मुलीशी लग्न केले आणि ७ वर्षे घरात डांबून केले अत्याचार !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना उघड

उच्च शिक्षित असल्याने धर्मांधांची जिहादी मानसिकता पालटत नाही, हे लक्षात घेऊन हिंदु मुलींनी धर्मांध मुलांपासून सावध रहा आवश्यक आहे !

अटक करण्यात आलेला धर्मांध दानिश

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील पारा येथे ‘लव्ह जिहाद’च्या आरोपाखाली एका धर्मांध आर्किटेक्टला अटक करण्यात आली आहे. दानिश नावाच्या या आर्किटेक्टने ‘देवेश’ बनून एका उच्च शिक्षित हिंदु मुलीला फसवले आणि तिच्याशी लग्न केले. तिला त्याचे खरे स्वरूप समजल्यावर त्याने तिला ७ वर्षे घरात डांबून ठेवले आणि अत्याचार केले.

१. मिळालेल्या माहितीनुसार दानिशने ७ वर्षांपूर्वी ‘देवेश’ बनून एका हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवले आणि तिच्याशी लग्न केले. त्यानंतर ते मुन्नू खेडा येथे भाड्याच्या घरात राहू लागले. लग्नानंतर काही दिवसांनी ज्याच्याशी तिने लग्न केले, तो ‘देवेश’ नसून ‘दानिश’ असल्याचे तिला समजले. तोपर्यंत फार वेळ निघून गेली होती.

२. काळानुसार दानिशची वास्तविकता पुढे येऊ लागली. त्याने पीडितेला पूजा करण्यास विरोध करणे चालू केले. त्याच वेळी त्याने दुसर्‍या लग्नाच्या गोष्टी करणे चालू केले. यावर पीडितेने असहमती दाखवली, तेव्हा त्याने तिला मारहाण करणे चालू केले आणि घराबाहेर पडण्यावर निर्बंध घातले. तसेच दानिशने पीडितेला गळा दाबून ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातून तिने स्वत: चा जीव वाचवून पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. त्यानंतर दानिशला अटक करण्यात आली.

३. पोलिसांनी सांगितले की, पीडिता चांगल्या घरची मुलगी आहे. तिचे वडील निवृत्त बँक अधिकारी आहेत. पदवीचे शिक्षण घेत असतांना तिची दानिशची ओळख झाली होती. पीडितेने सांगितले की, प्रारंभी दानिशचे आर्किटेक्ट असणे आणि त्याची जीवनपद्धती यांमुळे ती त्याच्याकडे आकर्षित झाली. कालांतराने दोघांनी लग्न केले. गरोदर झाल्यानंतर तिला दानिशचे खरे स्वरूप समजले, तेव्हा आरोपीने तिच्या संपूर्ण कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे ती काहीही करू शकली नाही. त्यांना ६ वर्षांची एक मुलगीही आहे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *