मथुरा (उत्तरप्रदेश) – महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने २६ आणि २७ फेब्रुवारी या दोन्ही दिवशी विविध ठिकाणी प्रवचने अन् ग्रंथप्रदर्शन यांचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही उपक्रमांना जिज्ञासूंचा चांगला प्रतिसाद मिळाला.
१. श्रीजी शिवाशा इस्टेट येथील मंदिरामध्ये प्रवचनाचे आयोजन
हिंदु जनजागृती समितीचे डॉ. भूपेश शर्मा यांनी येथील श्रीजी शिवाशा इस्टेटमधील मंदिरामध्ये शिवाच्या पूजनाविषयी प्रवचन घेतले. या वेळी त्यांनी शिवाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्रीय महत्त्व, पूजन शास्त्रानुसार कसे करावे ? महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ॐ नम: शिवाय’ नामजप करण्याचे लाभ आदींविषयी माहिती दिली. या प्रवचनाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.
२. सालाबाद जिल्ह्यातील ताजपूर येथे प्रवचनाचे आयोजन
महाशिवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सालाबाद जिल्ह्यातील ताजपूर येथे प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. अरविंद गुप्ता यांनी शिवाच्या उपासनेमागील अध्यात्मशास्त्रीय महत्त्व आदींविषयी माहिती दिली, तसेच श्री कुलदेवतेचा नामजप का करावा ? ‘श्री गुरुदेव दत्त’ या नामजपाचे महत्त्व सांगितले. या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
३. सनातन संस्थेच्या वतीने ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातनच्या डॉ. टीना खेरा यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या प्रवचनाचा अनेक जिज्ञासूंनी लाभ घेतला.
क्षणचित्र
सनातन संस्थेच्या वतीने शिवाशा इस्टेट कॉलनीतील शिवाशेस्वर महादेव मंदिर आणि गर्तेश्वर महादेव मंदिर या दोन ठिकाणी ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका प्रदर्शनावर एका जिज्ञासूने १२ मोठे ग्रंथ घेऊन अध्यात्माविषयी जिज्ञासा असल्याचे सांगितले.