Menu Close

बांगलादेशमध्ये धर्मांधाकडून गरोदर हिंदु महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या

बांगलादेशमध्ये हिंदू असुरक्षित !

बांगलादेशमध्ये धर्मांधांकडून सातत्याने हिंदू आणि त्यांची श्रद्धास्थाने यांवर आक्रमणे केली जात असतांना भारताने ती रोखण्यासाठी पावले उचलणे आवश्यक आहे. सरकार आता तरी तेथील अल्पसंख्य पीडित हिंदूंसाठी काही करील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात

धर्मांध झोबायर

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशच्या नारायणगंज शहरातील दलपोट्टी क्षेत्रात झोबायर नावाच्या धर्मांधाने एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसून गरोदर महिलेची आणि तिच्या आईची कोयत्याने वार करून हत्या केली. झोबायर याने भरदिवसा इमारतीतील पीडितांच्या घराचा दरवाजा ठोठावला. घराचे दार उघडताच त्याने घरात घुसून रितू चक्रवर्ती (वय २२ वर्षे) या गरोदर महिलेची आणि तिची आई रुमा चकवर्ती (वय ४६ वर्षे) यांच्यावर कोयत्याने वार केले. घरातील आणखी एका महिलेवर त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला; परंतु ती पळून जाण्यात यशस्वी झाली. तिने इमारतीच्या खाली जाऊन आरडाओरड केली. तिची ओरडणे ऐकून स्थानिक लोक जमा झाले. त्यांनी इमारतीचा मुख्य दरवाजा बंद केला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी आरोपीला कह्यात घेतले आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

१. रितू चक्रवर्ती हिचे वडील रामप्रसाद यांनी शोक व्यक्त करतांना सांगितले, ‘एका अनोळखी व्यक्तीने आमच्या स्वप्नांचा चक्काचूर करून आमचे कुटुंब उद्ध्वस्त केले. माझी मुलगी ७ मासांची गरोदर होती. त्या नराधमाने आमच्या नातवंडाचाही बळी घेतला.’

२. आरोपी झोबायर याने हत्या केल्याची स्वीकृती दिली आहे.तो चोरी करण्याच्या हेतूने घरात घुसला होता, असे नारायणगंज सदर पोलीस ठाण्याचे प्रमुख शहा झामन यांनी सांगितले. रामप्रसाद यांनी आरोपी झोबायर याच्या विरोधात तक्र्रार प्रविष्ट केली आहे. आरोपीला ३ दिवसांच्या पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे, अशी माहिती नारायणगंजचे पोलीस अधीक्षक झैदुल आलम यांनी दिली.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *