सूरत (गुजरात) – येथील ‘कपोदरा क्रॉसिंग’ जवळ एका सार्वजनिक शौचालयाच्या भिंतीवर श्री गणेशाचे चित्र रेखाटण्यात आले होते. याला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी विरोध करून त्याच्यावर पांढरा रंग लावून ते पुसून टाकले. हे शौचालय सूरत महानगरपालिकेच्या अंतर्गत येते. या प्रकरणी हिंदु संघटनांनी पालिकेच्या अधिकार्यांना चेतावणीही दिली. विश्व हिंदु परिषदेचे शहर सरचिटणीस कमलेश कयाडा यांनी सांगितले की, सूरत महानगरपालिकेला ठाऊक असले पाहिजे की, कोणत्याही इमारतीवर कोणत्याही देवतेचे चित्र रंगवणे, म्हणजे धार्मिक भावना दुखावणेे आहे. कुणालाही कंत्राट देतांना पालिकेने सतर्क राहिले पाहिजे. (महानगरपालिकेने हे कंत्राट कुणाला आणि कधी दिले होते ?, ही माहिती जनतेला कळली पाहिजे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)
सौजन्य : city today live