मूळात अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अवैध बाधकामांवर कारवाई का करत नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
चेन्नई – तमिळनाडू सरकार राज्यातील अनेक हिंदु मंदिरे अवैधरित्या बांधल्याचे कारण सांगून ती जमीनदोस्त करत आहे. कुठलीही अनुमती न घेता चेन्नईच्या पेरांबूर बॅरेक्स रोडला लागून अरबी महाविद्यालयाच्या नावाने एक इमारत बांधण्यात आली असून तिचे हळूहळू मशिदीत रूपांतर केले जात आहे. या इमारतीच्या बाहेर १४ फूट उंच खांबावर ध्वनीक्षेपक लावण्यात आला आहे. तेथील नावाची पाटी पालटण्यात आली आहे. हा प्रामुख्याने हिंदु लोकवस्तीचा परिसर आहे. कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी मशिदीची उभारणी स्वाकारली जाणार नाही. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी मशीद उभारण्यास अनुमती देण्यात आलेली नाही.
या घटनेविषयी चेन्नईचे जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि महानगरपालिका अधिकारी यांच्याकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. यावर शासनाने तातडीने कारवाही न केल्यास या अवैध मशिदीसमोर भव्य निषेधमोर्चा काढला जाईल, अशी चेतावणी ‘भारत हिंदु मुन्नानी’ने दिली आहे.