Menu Close

महाराष्ट्रातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ संस्थेत मार्गदर्शन करणार्‍या प्राध्यापकाकडून ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण !

  • अशी शिकवण घेऊन आय.ए.एस्. झालेले अधिकारी हिंदूंवर अन्याय होत असतांना कधी तरी त्यांना साहाय्य करतील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • ‘इक्रा आय.ए.एस्.’सारख्या हिंदुद्वेषी संस्था बुद्धीभेद करत असल्यामुळे भारतीय प्रशासनात बहुतांश हिंदुद्वेष्ट्यांचा भरणा आहे, हे लक्षात घ्या ! अशांवर सरकारने त्वरित कारवाई करणे हिंदूंना अपेक्षित आहे ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

उजवीकडे अवध प्रताप ओझा

नवी देहली – नुकतेच लोकसेवा आयोगाच्या परीक्षांच्या पूर्वसिद्धेसाठी मार्गदर्शन करणार्‍या ‘व्हिजन आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेतील एक व्हिडिओ प्रसारित झाल्यामुळे तेथे हिंदुद्वेष पसरवला जात आहे, हे समोर आले होते. आता आय.ए.एस्.च्या पूर्वसिद्धतेसाठी मार्गदर्शन करणार्‍या पुण्यातील ‘इक्रा आय.ए.एस्.’ (आय.क्यू.आर्.ए. आय.ए.एस्.) या प्रशिक्षण संस्थेत शिकवणारे अवध प्रताप ओझा हे कुख्यात आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण करतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. अवध प्रताप ओझा हे व्यवसायाने अधिवक्ता असून इतिहासाचे वरिष्ठ प्राध्यापक आहेत.

ओझा यांनी केलेली वादग्रस्त विधाने –

१. ओसामा बिन लादेन याला ठाऊक होते की, त्याला कुणाशी लढायचे आहे. त्याने अमेरिकेवर आक्रमण करून व्यापारी केंद्रे पाडली. त्याने अमेरिकेत घुसून तिला चपराक दिली. त्याने एकदाच आक्रमण केले. याला स्वप्न म्हणतात. अमेरिकन सैन्याने अबोटाबादमध्ये घुसून त्याला मारले, हे महत्त्वाचे नाही.

२. अफगाणिस्तानात अमेरिकेचे अपयश अधोरेखित करतांना ओझा यांनी तालिबानची बरोबरी राजपूत आणि मराठा यांच्या सैन्याशी केली. (राजपूत आणि मराठा हे देव, देश आणि धर्म यांसाठी लढले. याउलट तालिबान्यांनी रक्तपात घडवून निरपराध लोकांना मारले. अशी तुलना करणे, ही ओझा यांची बौद्धिक दिवाळखोर होय ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

३. जगात संपूर्ण अंधार होता तेव्हा प्रेषित महंमद पैगंबर यांनी जगाचे प्रबोधन करण्यासाठी इस्लामला आणले. इस्लाम तलवारीने नव्हे, तर शांततेने वाढला. (भारत आणि जगातील इस्लामच्या विस्ताराचा इतिहास पहाता या वक्तव्यावर लहान मूल तरी विश्‍वास ठेवील का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

४. इस्लामचा प्रसार होण्यापूर्वी युरोपमध्ये महिलांना काळी जादू करत असल्याच्या नावाखाली मारले जात होते. चीनमध्येही मुलींना मारले जायचे, तसेच भारतात सतीप्रथा होती. जगात अशा प्रकारे अंधकार होता. त्या वेळी महंमद पैगंबर हे हातात दिवा घेऊन जग प्रकाशमान करण्यासाठी उभे होते. (इस्लामी जगात महिलांना उपभोगाची वस्तू म्हणून पाहिले जाते. त्यामुळे ‘इस्लाममध्ये महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते’, असे म्हणणे हा मोठा विनोद होय ! – संपादक दैनिक सनातन प्रभात)

५. हा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर ‘इक्रा आय.ए.एस्.’मध्ये शिकणार्‍या अनेकांनी याविषयी मते मांडली आहेत. ‘ओझा यांनी केेलेली वक्तव्ये ही हिमनगाचे टोक आहेत. त्यांनी इतिहासाविषयी वादग्रस्त विधाने केली आहेत’, असे मुलांनी म्हटले आहे. (आय.ए.एस्. होण्यासाठी अशा प्रशिक्षण संस्थेत जाणारे विद्यार्थी असली वक्तव्ये ऐकून कशी घेतात ? याला वैध मार्गाने विरोध का केला जात नाही ? – संपादक दैनिक सनातन प्रभात)

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *