Menu Close

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

  • तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे संतापजनक विधान !

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधातही विखारी टीका !

  • हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणारे तेलंगाणाचे मुख्यमंत्री अन्य धर्मियांच्या विरोधात चकार शब्दही काढत नाहीत, हे लक्षात घ्या ! यातून त्यांचा हिंदुद्रोह लक्षात येतो ! – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ? – संपादक दैनिक सनातन प्रभात
  • बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात मुख्यमंत्रीपदासारख्या एका महत्त्वपूर्ण घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती हिंदु धर्माचा अवमान करते, हे हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक दैनिक सनातन प्रभात

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव

भाग्यनगर (तेलंगाणा) – राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केंद्रातील भाजप सरकारला बंगालच्या खाडीत फेकून देण्याचे जनतेला आवाहन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धर्माचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ‘भाजपमधील नेते हे मूर्खांचा समूह असून भगव्या ध्वजाला बंगालच्या खाडीत बुडवायला हवे’, असे संतापजनक विधानही त्यांनी केले. ते वनापार्थी जिल्ह्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव पुढे म्हणाले की,

१. मोदी यांचा मूर्खपणा आणि हट्टीपणा देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करत आहे.

२. धर्मांध शक्ती देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत.

३. भाजप हा द्वेषाचे राजकारण करत असल्याने जनतेने त्याच्यापासून सावध रहावे.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *